सावरगाव येथील बार तात्काळ बंद करा.
( महिलांनी महिला सभेमध्ये वादग्रस्त बिअर बार बंद करण्याचा घेतला ठराव
यश कायरकर,(तालुका प्रतनिधी):
तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे नुकताच सुरू झालेला वादग्रस्त 'फ्रेंड्स रेस्टॉरंट अँड बार' हा अत्यंत वादग्रस्त भुमिकेत सुरू झालेला असून. याला तात्काळ बंद करण्यात यावे याकरिता सावरगाव येथील महिलांनी एकजुटीने महिला सभा घेत या बार ला बंद करण्याकरता मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून महिला सभेमध्ये ठराव मंजूर करून घेण्यात आला आहे.
सावरगाव येथील परिसरात फक्त रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी मागून त्या आड परवानाधारक हा बार उघडणार असल्याची चाहूल लागताच प्रशासनाने त्याला बार उघडण्याची परवानगी देऊ नये असे निवेदन खुद्द सरपंचाने स्वतः जिल्हाधिकाऱ्याकडे व अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्याकडे जाऊन दिले असतानाही या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून सत्यतेची व गावाच्या हिताची कोणतीही पडताळणी न करता जिल्हा अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क व जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने बार मालक सोनू नितीन कटारे तळोधी (बा.) यांना बार उघडण्याचा परवाना देऊन मोकळे झाले.
कोणतेही रेस्टॉरंट किंवा धाबा हा सहा महिने लगातार सुरू करून चालवलेला असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.सहामहिन्या नंतर त्या दुकानाची वाढ करण्यासाठी बियर बार सुरु करायला शासनाकडून परवाना मिळत असला तरी शाळा, मंदिर किंवा गावातील श्रद्धांस्थान असलेले कोणतेही धार्मिक स्थळा जवळ दारूचे दुकान सुरु करण्यासाठी शासनाची सक्त मनाई आहे. असे असतांना सुद्या शासनाची दिशाभूल करून सोनू नितीन कटारे यांनी गावातील सर्वाचे श्रद्धांस्थान असलेल्या मातामंदिराच्या समोरच फ्रेंड्स रेस्टॉरंट अँड बार सुरु केले. ग्रामपंचायत ने बार ला परवाना न देन्याचे निवेदन दिले असतांना सुद्धा, हेतुपुरस्सर की काय ? मात्र त्याबद्दल कोणतीही पडताळणी ही परवाना देनार्या संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या द्वारे करण्यात आली नाही
*बांधकाम अपुरेच असताना व मुळात कोणताही ढाबा किंवा रेस्टॉरंट सुरू नसताना घाईघाईने एकाच वेळेस ढाबा व बिअर बार चे उद्घाटन करून मोठ्या थाटामाटात बार सुरू करण्यात आला.* मात्र ही बाब गावकऱ्यांसाठी आश्चर्याची ठरली व यामुळे गावातील महिलांनी याच्याविरुद्ध मोर्चा उघडला असून ग्रामपंचायतवर ग्रामसभेने दबाव आणून हा बार लवकरात लवकर बंद करण्यात यावा त्याकरिता महिलासभा घेण्यात आली. व गावातील नव्याने उघडलेला बार बंद करण्याचा ठराव आयोजित महिलासभेत मोठ्या संख्येने एकजुट झालेल्या महीलांनी पारित केला. जर का संबंधित अधिकाऱ्यांनी या बारचा परवाना रद्द करून बार बंद नाही केले तर गावातील संपूर्ण महिला एकत्रित येऊन रस्त्यावर उतरू असी ही चेतावणी यावेळेस महिलांनी ग्रामसभेत दिली. संबंधित अधिकारीच जिम्मेदार राहतील.
आता जिल्हाधिकारी व अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क या संबंधित अधिकाऱ्यांनी बार उघडण्याचा जो परवाना बार मालकाला दिलेला होता तो रद्द करून महिला सभेचा मान राखतात की काय ? याकडे महिलांचे लक्स लागलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!