सरपंचाची बनावट सही करून परवाना मिळविल्याचा आरोप,


 सरपंचाने केली पोलिसात तक्रार,  सावरगाव ग्रामसभेने परवाना रद्द करण्याची केली मागणी 

तळोधी (बा.) :- 
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे "फ्रेंड्स" बार अँड रेस्टॉरंट सुरू करताना तत्पूर्वी ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांची सही काही ठिकाणी आवश्यक असते त्यासाठी परवानाधारकाने सरपंच यांची खोटी सही व शिक्का वापरून परवाना मिळविल्याचा आरोप होत असून सरपंच रवींद्र मिशन निकुरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे .
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे सौ . कटारे यांनी जागा खरेदी करून फ्रेंड्स हॉटेल अँड रेस्टॉरंट करिता मकानाचे काम पूर्ण केले त्यासाठी बांधकाम करताना ग्रामपंचायत कडून रीतसर बांधकामाची परवानगी मागितली यासाठी ती त्यांनी दिली परंतु त्यात फ्रेंड्स बार अँड रेस्टॉरंट सुरू करताना मकान चे काम परिपूर्ण झाले. (पूर्णत्वाचा दाखला ) यासाठी सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांची त्या पूर्णत्वाच्या दाखल्यावर सही व शिक्का वापरून परवाना  मिळविला व फ्रेंड्स बार अँड रेस्टॉरंट सुरू केले . त्यामुळे सरपंच यांनी तळोधी बा. पोलीस स्टेशनला  तक्रार दाखल केली .
परंतु  गावातील नागरिकांच्या मनात गावात अगदी गावाला लागून बार सुरू झाल्याने मनस्ताप सुरू झाला . त्यामुळे 30. ऑगस्टला पार पडलेल्या ग्रामसभेत मा. अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयात मुद्दा उपस्थित करून सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले व त्यात पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप करीत परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली.. यात सरपंच रवींद्र निकुरे यांनी मी परवानाधारकाच्या कोणत्याही कागदपत्रावर सही केलेली नाही त्यामुळे मी पोलीस स्टेशनला बार मलकाविरोधात  तक्रार दाखल केली आहे .  यावरही उपस्थितांचे समाधान न झाल्याने विशेष ग्रामसभा बोलविण्याचे मान्य करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!