भाजपा महिला आघाडीच्या वतीने सफाई कामगारांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त




भाजपा महिला आघाडी मूल च्या वतीने सफाई कामगार बंधूना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत केला रक्षाबंधन कार्यक्रम साजरा, यावेळी मा. संध्याताई गुरूनूले माजी अध्यक्ष जि.प चंद्रपुर, मा. प्रभाकर भोयर भाजपा शहर अध्यक्ष, प्रा. रत्नमाला भोयर ,माजी नगराध्यक्ष, संजिवनी वाघरे , अर्चना चावरे, कल्पना मेश्राम,वंदना वाकडे, पपीता झरकर, शुभांगी भोयर, मिनाक्षी छोंकर, ममता कंठीवार, मनिषा भोयर, भारती हरमवार उपस्थित होत्या. 80 बाधवांना राखी बांधून सर्वाना रूमाल भेट दिल्या, व नाश्ता दिला. मा. संध्याताई गुरूनूले यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितले तर प्रा रत्नमाला भोयर यांनी रक्षाबंधन चे आपल्या जीवनातील महत्त्व व भाऊ- बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाची महत्ती प्राचीन कथातून विषद केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!