राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ व मूल तालुक्यातील प्रमुख बहुसंख्य पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र दर्शन (तीर्थयात्रा व विविध पर्यटन स्थळे) करीता रवाना




        मूल तालुक्यातील  येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून व सदर निवडणुकांची रणधुमाळी सुरु करण्यापूर्वी  देव -देवतांचे आशीर्वाद घेण्याकरिता माहूर देवी, शेगाव चे गजानन महाराज , शिर्डीचे साईबाबा , शनी शिंगणापूर  इत्यादी पवित्र स्थानाचे दर्शन  घेण्याकरीता  मूल येथून  मूल तालुक्यातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी  निघाले आहेत.


        येणाऱ्या निवडणुकीत घव -घवीत यश संपादन करीता  देव-देवतांचे आशीर्वाद मिळवून येणाऱ्या निवडणुकीत अतिशय स्फूर्तीने  विरोधकाला लढा देण्याकरिता  व घाम फोडण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यात जोश व ऊर्जा तयार व्हावी ह्या उद्देशाने  आज दिनांक २५-०८-०२३ रोजी शुक्रवारला  रात्री 9 .00 वाजता मूल तालुक्यातील  बहुसंख्य पदाधिकारी महाराष्ट्र महादर्शन यात्रे करिता रवाना झाले महाराष्ट्र दर्शन  यात्रे चा लाभ मिळण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते सुमीत समर्थ ह्यांनी स्वतः संपूर्ण स्वखर्चाची जवाबदारी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांना देवदर्शन व पश्चिम महाराष्ट्रतील कृषीउद्योग, राहुरी विद्यापीठ व विविध पर्यटन स्थळे  बघण्याचा  व आनंदाचा लाभ मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न  केलेला आहे.
      ह्यामध्ये ग्रामीण भागातून गाव प्रमुख ,  शहरातून वार्ड प्रमुख  व कार्यकारणी ह्याप्रमाणे सदर सहली मध्ये  बहुसंख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!