नाली बांधकामावरील मजुराची फाशी लागून आत्महत्या



तळोधी (बा.) यश कायरकर;
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत तालुक्यातील चिंधी चक येथे नाली बांधकामावरील मजुरा किरायाच्या राहत्या घरी फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारला उघडकीस आली.
 मजूर सत्यजीत मंडल (२५) रा. गोठणगावं, संजयनगर गोंदिया जिल्हा, येथील रहिवासी श्रिमती ज्योतिबाई विजय नन्नावरे चिंधी चक, यांच्या घरी आपल्या काही मजूर सहकार्यांसोबत किरायाने राहात होता . मात्र आज त्याने साथी मजूर घरी उपस्थित नसताना, कामावर गेले असताना घरात फाशी लागून आत्महत्या केल्याची घटना घडली. 
      बाकीचे मजूर साथी कामावरून दुपारला घरी रुमवर परतले असताना त्याला हा फाशी लागून मेला असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ तशी माहिती गावातील लोकांना व पोलिसांना दिली त्यानंतर नागभीड येथील पोलीस व मृतकाचे आई वडील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करता नेण्यात आले.  मृतक हा कालच आपल्या राहत्या गावावरून कामावर परत आला असल्याचे बोलले जाते . मात्र आत्महत्येच्या घटनेमागील कारण कळू शकले नाही.  मात्र समोरील तपास पिएसआय योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पो.काॅ. देठे, उईके, नागभीड पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!