जलशुद्धीकरण केंद्राला पुरवठा होणाऱ्या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची पवनी नागरिक संघर्ष समितीची मागणी
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या जल शुद्धीकरण केंद्राला सांडपाण्याचा पुरवठा होत असल्याने पवनी करांचे आरोग्य धोक्यात आले आहे वरील समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास पवनी संघर्ष समिती जन आंदोलन करेल असे निवेदन देण्यात आले.
पवनी संघर्ष समितीच्या सदस्यांनी दि.६/०५/२०२३ ला हत्ती गोटा परिसरात पाहणी केली असता समितीच्या असे लक्षात आले की संपूर्णपणे शहरातील सांडपाणी मलयुक्त व केमिकल युक्त पाणी थेट जलशुद्धी केंद्राला वळविण्यात आले आहे. यामुळे पवनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण झालेला आहे. याचमुळे संपूर्णपणे शहरात दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी याचा सतत पुरवठा होताना दिसत आहे. यावर उपाय योजना म्हणून सांडपाण्याला योग्य ठिकाणी वळवून नदीतील इतर ठिकाणी निचरा केला व नंतर त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली तर योग्य होईल तसेच संघर्ष समितीच्या असे लक्षात आले की वैनगंगा नदीत लोक निर्माल्य, उरलेले अन्न फार मोठ्या प्रमाणात टाकत असतात पण आता नदीचा प्रवाह उन्हाळ्यामुळे कमी असल्यामुळे तेथे दुर्गंधी व नदीत घाण होत आहे वरील समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास संघर्ष समिती नगर परिषदेच्या विरुद्ध कठोर पाऊल उचलून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारू असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे.
निवेदन देतेवेळी यादव भोगे ,खालीद खान, लियाकत अली, डॉ. राजेश नंदुरकर ,राहुल फुंडे, महेश बोरकर, सय्यद तरबेज, मोनू खान, वसीम शेख, माधुरी तलमले ,संजय पुरी वैकुंठ, हर्षल वाघमारे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!