जिल्हास्तरीय छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न चार हजार विद्यार्थी पालकांनी घेतला करिअर शिबिराचा लाभ
चंद्रपूर (प्रतिनिधी)-
शासनातर्फे होत असलेले शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर ही संकल्पना कौतुकास्पद असून या शिबिरातून युवा वर्गाने प्रेरणा घेऊन जीवनात यश संपादन करावे. जेणेकरून चंद्रपूरचा गौरव वाढेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले .
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे जिल्हास्तरीय आयोजन प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आ. किशोर जोरगेवार, आ. सुधाकर अडबाले, फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य रवी मेहेंदळे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात लावलेल्या शैक्षणिक प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते व आ. सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत झाले.
या शिबिरांमध्ये स्पर्धा परीक्षा तयारी विषयावर सहाय्यक जिल्हाधिकारी मुरगानंथम एम. यांनी मार्गदर्शन केले तर पालक- विद्यार्थांसाठी दिशादर्शन या विषयावर पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी विचार मांडले. दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी या विषयावर डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवर यांनी विचार मांडले . महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया विषयावर डॉ. सुधीर आकोजवार यांनी मार्गदर्शन केले तर गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. मनीष उत्तरवार यांनी'करिअर व ध्येय निश्चिती' विषयांवर विचार मांडले. प्रा. शाम हेडाऊ यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर तर 'करिअर कसे घडवावे ? ' या विषयावर विजय मुसळे यांनी मार्गदर्शन केले. तर विविध स्पर्धा परीक्षा संबंधी विलास मोरे यांनी माहिती दिली. शिबिराचे सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी केले तर अभय घटे यांनी आभार मानले. शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थाचे प्रतिनिधींनी या शिबिरात मार्गदर्शन केले. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी विषयी माहिती शिबिरस्थळी देण्यात आली. जिल्ह्यातील अंदाजे चार हजार विद्यार्थी आणि पालकांनी या करिअर प्रदर्शनीस भेट देऊन शिबिराचा लाभ घेतला. तसेच ना. मुनगंटीवार यांनी सदर करियर प्रदर्शनीचे कौतुक करून या पद्धतीची प्रदर्शनी जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयाच्या परिसरात लावण्याविषयी सूचना केली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेतील गटनिदेशक श्री. गभणे, शेंडे ,गेडकर, टोंगे,सौ. गभने , शिल्प निदेशक श्री.लांडगे ,मडावी, खंडाते, बांबोडे, बोढाले, राघोर्ते, उंबरकर, खोब्रागडे, सौ. गोरलेवार,सौ. हेलवडे, कु. साखरकर ,कांबळे, बोंबले, बोकडे ,बांते ,नाडमवार, कोशटवार, रोडे ,रणदिवे, मार्तीवार, खेडेकर, गाडेकर , बोडखे तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. तिरणकर, भोगेकर ,रोकडे, सौ. वरठे आणि सर्व तासिका निदेशक व कर्मचारी वृदांनी अथक परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!