कोतवालाचे आरक्षण जाहीर
मूल तालुक्यातील १ राजोली २ चिखली ३ नलेश्वर ४ नांदगाव ५ केळझर ६ नवेगाव भूजला या ६ गावातील कोतवाल भरती करावयाची असल्यामुळे दिनांक २४ मे २०२३ ते ०७ जुन २०२३ कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहे,त्यासाठी आज कोतवाल पदभरती २०२३ जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
गावाचे नाव
राजोली प्रवर्ग अनुसूचित जमाती जागा १
चिखली इतर मागास प्रवर्ग १
नलेश्वर अनुसूचित जमाती १
नांदगाव भटक्या जमाती. १
केळझर अनुसूचित जाती १
नवेगाव भूजला इतर मागास प्रवर्ग १
६तलाठी साझ्यातील रिक्त पदाची होणार भरती तालुक्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी साजामधील रिक्त कोतवाल पदाची भरती करण्याच्या उद्देशाने ९ मे ला संवर्ग निहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. मात्र अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले होते. आता ही आरक्षण सोडत आज दि. १९ मे रोज शुक्रवारला तहसिल कार्यालय,मूल येथे दुपारी ४ वाजता काढण्यात आली आहे.तहसील कार्यालयांतर्गत या ०६ तलाठी साझ्यात कोतवालाची पदे रिक्त आहेत. ज्यामुळे शेतकरी, नागरीक तथा तलाठी यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोतवालाचे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अंतर्गत संवर्ग निहाय आरक्षण निश्चीत करण्याकरिता आरक्षण सोडत काढण्याचे ठरविण्यात आले आहे. आज झालेल्या सोडती संबधात जाहीरनामा तहसील कार्यालयामार्फत लावण्यात आला आहे. तालुक्यातील या ०६ साझ्यातील रिक्त कोतवालाच्या पदाकरिता उमेदवारांनी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार डॉ. रविन्द्र होळी यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!