सावरगाव जवळ चार चाकी अपघात , चौघे जखमी तर एक गंभीर.
यश कायरकर. तालुका प्रतिनिधी .;
तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील एचपी पेट्रोल पंप जवळ आज पहाटे 5:30 वाजता चे सुमारास झालेल्या चार चाकी अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की बल्लारपूर येथील सौरभ रमेश गोंगूरवार, गोवर्धन वार्ड बल्लारशा याच्या लग्नाच्या कपड्यांमध्ये नवरदेवाचा ड्रेस नसल्याने व आजच त्याचा लग्न असल्याने नवरदेवाचा ड्रेस आणण्याकरिता नागपूरला गेलेले व रात्री नागपूर वरून 3 वाजता होंडा कंपनीची MH- 34-BV- 31 31 या कार ने निघुन बल्लारपूर करिता परत येत असताना सावरगाव येथील एचपी पेट्रोल पंप जवळ पोचल्या नंतर 5:30 वाजता ड्रायव्हरला झपकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पुलाच्या कटड्याला आदळल्याने हा अपघात झाला.
यात ड्रायव्हर पवन सुनील बोपनवार (28) याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर गाडीत बसलेले नितीन प्रदिप गोलीवार (25) तुमसर यांचा उजव्या हाताला गंभीर दुखापत, तर सुमित रमेश गोंगुलवार (33) किरकोळ जखमी, तर कुणाल सुमित बोपनवार वय (33) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळत असते पोलीस यांनी मुक्काम स्थळ गाठून त्यांना नागभीड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर चौघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटना स्थळाचा पंचनामा करून समोरील तपास हे तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक सब इन्स्पेक्टर सुधाकर भानारकर व पोलीस अ. विनोद चौधरी हे करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!