चिमुर-काम्पा रोड वर गोसीखुर्द नहराच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

काही दिवसातच पुलाच्या बांधकामाच्या सलाखी निगाल्या बाहेर

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - तालूक्यातुन गोसीखुर्द धरणाचा एक नहर खरखाडा गावालगत असून चिमुर-काम्पा रोड वर नहराच्या पुलाचे बांधकाम काही दिवसा अगोदर करण्यात आले होते.परंतु काही दिवसातच या बांधकामाची सलाख बाहेर निघाल्याने कामाची सत्यता आणि गुणवत्ता काय ते उघड झाली.यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहतुकाला अडचन येत आहे.सरकार या बांधकामासाठी अरबो रूपये खर्च करीत असतात.तरीही इस्टीमेट नुसार कोणतेही बांधकाम कंत्राटदार काम करीत नाही.कारण पंन्नास टक्के निधी हा मंत्री,खासदार, आमदार, कंत्राटदार व अभियंता यामध्ये वाटप होत असतात तर पन्नास टक्के निधी कंत्राटदार बांधकाम करीत असतात.म्हणूनच कोणतेही बांधकाम हे खालच्या दर्जाचे होत असतात.अश्या बांधकाची वरीष्ठ पातळीवर चौकची करून कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सर्वसामान्य जनते कडून तसेच शेतकरी यांचेकडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!