पेट्रोल पंप मालकाच्या हॉटेलला लागली आग
अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने मोठी हानी टळली
चिमूर येथील घटना
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमूर शहरातील उमा नदीच्या काठावर एका हॉटेलला आग लागली.या होटेल समोर पेट्रोल पंप असल्याने आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग फार भयंकर असल्याने अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले.अशी माहिती मिळाली. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्याने मोठी हानी होता - होता ठळली. हि घटना दिनांक २८ मे रोजी मासळ रोड वरील हिंगे पेट्रोल पंप ला लागून असलेल्या पंप मालक हिंगे हॉटेल ला शॉट सर्किट मुळे अचानक आग लागली व आगीने खूप मोठा भडका घेतल्याने हॉटेल मधील १ फ्रिझर , १ फ्रिज , रोख रक्कम व दुकानातील साहित्य असे अंदाजे ३००००० / - तिन लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषद कर्मचाऱ्यांना माहिती दिली चिमूर नगरपरिषदची अग्निशामक टिम ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आनण्यात त्यांना यश आले. परंतु काहिही अंतर नसलेल्या पेट्रोल पंपावर फायर ची सुविधा तसेच फायर सिलेंडर ची कमतरता व रेतीने भरलेली ड्रम नसावी असा अंदाज चिमूर शहरात जनतेकडून वर्तविण्यात येत आहे. सेफ्टी च्या संदर्भातून अधिकारी यांनी याकडे लक्ष का दिले नसावे ? समोर अशाप्रकारे घटना घडू नये म्हणून शासकीय पध्दतीने नियमानुसार चौकशी सर्व चिमूर तालुक्यातील पेट्रोल तथा डिझेल पंपांवर व्हायला हवी.अशिही मागणी वाहन चालकांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!