.ने. हि.विदयालय नवेगाव पांडव येथे "माजी विदयार्थी मेळावा-2023" थाटात संपन्न
तळोधी (बा.);
शालेय स्तरावरील भव्य माजी विदयार्थी मेळावा 2023 ने.हि.विदयालय नवेगाव पांडव येथे पार पडला.
250 विदयार्थी व त्यांच्या परिवारासह ५० वर आजी माजी शिक्षकांच्या उपस्थितित हा मेळावा संपन्न
झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थ ने. भै.हि.शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया, तर उद्घाटक म्हणून माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार व माजी मंत्री शोभाताई फडणविस, शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, मेळावा संयोजक प्रा.महेश पानसे, नवेगाव पांडव सरपंच ॲड. शर्मिला रामटेके उपस्थीत होते.
या मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री विजय वडेट्टीवार व शोभाताई फडणविस यांनी केले. आयोजन समिती तर्फे शाल,श्रीफळ,फुलगुच्छ व आकर्षक
मा. प्रा. महेश पानसे यांनी प्रास्ताविक करून आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. प्रा.महेश पानसे संपादित "स्नेहछटा" या मेळावा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रथम सत्रात मान्यवर
अतिथींचे हस्ते क़िडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट माजी विदयार्थी अनिल मांडवकर,उदयोग क्षेत्रातून रविकिरण सहारे,कृषी क्षेत्रातून नवनाथ नवघडे यांना विदयालयातर्फे गुणवंत पुरस्कार देन्यात आला. तर
प्रा.महेश पानसे,डॉ.विठ्ठल बोरकुटे, सुबोध दादा यांनी सेवाभावी व उल्लेखनीय कार्यासाठी सेवाव्रती सन्मान देऊन गौरविण्यात आले.
१९६० पासून शिक्षकपदावर कार्यरत ४० वर शिक्षकवुदांना मान्यवरांचे हस्ते
विशेष उपहाराने सन्मानीत करण्यात आले. विशेष म्हणजे या मेळाव्यात गेली ४० ते ४५ वषं दुरावलेल्या विदयार्थी व विद्यार्थिनीची झालेली भेट अतिशय आनंदपूर्ण व भावनिक होती.
आमदार सुधाकर अडबाले, आमदार विजय वडेट्टीवार व माजी मंत्री शोभाताई फडणविस, सरपंच ॲड. शर्मिला रामटेके यांनी संवाद साधला.
दुपारचे भोजनानंतर शाळेचे माझी शिक्षक निवृत्त शिक्षणाधिकारी शिशीरबाबा घोनमोडे यांचे अध्यक्षतेखाली दुसरे सत्र पार पडले.
यावेळी प्रमुख आतिथी म्हणून माजी विदयार्थी तथा निवृत्त उपसंचालक आरोग्य विभाग डॉ.गणेश रामटेके,माजी विदयार्थी तथा निवृत्त संचालक डॉ.शिवनकर, माजी विदयार्थी प्राचार्य लेमराज लडके हे होते.
माजी विद्यार्थी मेळावा 2023 चे संचालन सतिश डांगे व शिक्षक मुनिराज कुथे यांनी केले. शाळा प्रभारी नरेंद्र चुऱ्हे व शिक्षकवृंद यांनी माजी विदयार्थी मेळावा समितीला संपुर्ण
सहकार्य केले.या मेळाव्यात अनेक माजी विदयार्थी व विद्यार्थिनी यांनी
मनोगत मांडले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!