महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी(MRGS) अंतर्गत क्रीडांगणाचे भूमिपूजन
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी(MRGS) अंतर्गत क्रीडांगणाचे भूमिपूजन
दिनांक 19 एप्रिल 2023 ला मुल तालुक्यातील चिचाळा गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत क्रीडांगणाच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन सौ जास्मिता ताई लेनगुरे सरपंच ग्रामपंचायत चिचाळा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी MRGS चे अभियंता श्री मान. बोंगुलवार सर ,सौ रेखाबाई निकेसर ग्रामपंचायत सदस्य चिंचाळा , अनुप लेनगुरे रोजगार सेवक चिंचाळा , विलास लेनगुरे संगणक ऑपरेटर ग्रामपंचायत चिचाळा , विजय केळझरकर शिपाई ग्रामपंचायत चिचाळा तसेच गावातील युवक वर्ग या सर्वांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत च्या मालकी च्या जागेवर उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. गेल्या कित्येक दिवसांपासून गावातील युवक वर्गांची क्रीडांगणासाठी जोरदार मागणी सुरु होती, शेवटी ग्रामपंचायत चिचाळाला यश मिळाले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ग्रामपंचायत चिचाळा अंतर्गत क्रीडांगणासाठी अंदाजपत्रकीय किंमत 21 लाख रुपये एवढे आहे. क्रिडांगणामध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल ,लांब उडी ,रनिंग ट्रॅक ,कबड्डी व बसण्याच्या सोयीसाठी खुर्च्या या सर्वांचा समावेश आहे. सध्या गावात आनंदाचे वातावरण सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!