पुरोगामी विचार रुजवायचा तर संघटनेची आचारसंहिता असली पाहिजे : डॉ. अल्का ठाकरे


जिल्हासरचिटणीस म्हणून सुरेश गिलोरकर यांची निवड

पुरोगामी शिक्षक संघटना ही प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रगण्य संघटना म्हणून नावारूपास येत असताना काही मनभेद जोपासणारी वृत्ती संघटनेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत असते . त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून संघटन वाढीसाठी आचारसंहिता असली पाहिजे . असे मत राज्य महिला अध्यक्ष डॉ. अल्का ठाकरे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मासिक सभेत व्यक्त केला .
                प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या व विषयावर आढावा तसेच चर्चा करून नियोजन करण्याकरिता जनता महाविद्यालयात आयोजित सभेला जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , राज्यनेते विजय भोगेकर , जिल्हा महिलाध्यक्ष विद्या खटी , सल्लागार सुनीता इटनकर , कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , उपाध्यक्ष रवी सोयाम , सुभाष अडवे , राज्यसचिव निखिल तांबोळी , लोमेश येलमुले , सर्व तालुक्यातील अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते सुरेश गिलोरकर यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड करून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!