तीन वर्षीय मुलाचा वडिलांनीच केला खून


मूल राजोली 

मूल तालुक्यातील राजोली येथे तीन वर्षाच्या मुलाला वडिलांनी गळा दाबून खून केल्याची घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशु गणेश चौधरी वय 3 वर्षे असे चिमुकल्याचे नांव आहे तर गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे असे खुन करणाऱ्या पित्याने नांव आहे.

राजोली येथील गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेल्याची माहिती आहे. घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला, आणि स्वताच्या गळावर चाकुने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!