चिमूर नगर परिषदेणे टँकरद्वारे प्रत्येक प्रभागात पाणी पुरवठा करावा व पाणी पट्टी कर माफ करावा - काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांची मागणी


उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमूर नगर परिषदेच्या अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप वाढत चालली आहे. ५३ कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना येऊन तीन वर्षपासुन अजून पर्यंत कामे पुर्ण झाली नाही. कामाची कालावधी पूर्ण होऊन सुध्दा चिमुरची जनता पाण्यासाठी भटकत आहे. ग्राम पंचायत असतांनासुध्दा दररोज नळाला पाणी येत होते कधिही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नव्हती नंतर नगर परिषद झाली आणि पाच वर्षे नळ ये - जा करणे सुरू झाले आणि काही भागात माणिक नगर, वेलकम कॉलोनी , सौदागर नगर तिरखुरा रोड , काडकुड नगर वडाळा, पेट मोहल्ला, आझाद वार्ड ,असे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी येत नाही अशी समस्या वाढत चालली आहे. चिमूर येथील बंदारा पुर्ण पणे कोरडा पडला असुन सुद्धा याकडे नगर परिषद चे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. नळाला पाणी पुरवठा बरोबर होत नाही आहे. एक दिवसाचा आड नळ येतो परंतु पूर्ण पने येत नाही. याकडे नगर परिषद अजून पर्यंत उपाय योजना करीत दिसत नाही. दिवसेन दिवस तापमान वाढत चालले आहे.जनतेची ताण वाढत चालली आहे. अंगाची लाई - लाई होत असून कडक ऊन्हात २ किमी अंतर गाठून पाणी आणावे लागत आहे. तर शेकडो लोकांची रांग पाणी फिल्टर वर ५ रुपये कॉइन घेऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. नगर परिषद मकान कर,दिवा बत्ती कर, स्वच्छता कर, आणि पाणी पट्टी कर भरण्या करीता सक्ती लावतात मग जनतेला पुर्ण पने पाणी का देत नाही. असा सवाल काँग्रेसचे मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केले आहे. तरी तात्काळ नगर परिषदेने पाण्याची व्यवस्था करावी न केल्यास नगर परिषदेच्या समोर घागर फोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पू शेख यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!