गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या पगाराची कपात किती?



गुवाहाटीला गेलेल्या आमदारांच्या पगाराची कपात किती?राज्यात सत्तांतरण झालेल्या प्रकरणात "सुरत टू गुवाहाटी" प्रवास करून, महिणाभर गुवाहाटीत मुक्काम करणार्या आमदारांचा पगार कपात किती करण्यात आली? याची तपशिलासह माहिती, माहितीच्या अधिकाराअंतर्गत मंत्रालयाचे सामान्य प्रशासन विभागाला विचारणा केली आहे.  यावर मंत्रालय कोणते उत्तर देते, हे पाहणे मजेशीर राहणार आहे. मागीतलेल्या माहीतीत, 1. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची नाव आणि तपशिल मिळावा, 2. कामकाज सोडून गेल्यांने जनतेला हाल अपेष्टा सहजन कराव्या लागल्या.  त्यांचे काम नाही वेतन नाही च्या धोरणानुसार त्या महिण्यात कपात करण्यात आलेल्या वेतनाच्या रक्कमेचा तपशिल मिळावा. 3. परवाणगी न घेता आपले कामकाज सोडून गुवाहाटीला एक महिणा गेलेल्या आमदारावर नियमानुसार करण्यात येत असलेल्या आमदारांचा पतशिल मिळावा. 4. सदर आमदारावर कारवाईसाठी ज्या सक्षम प्राधिकारी अथवा न्यायासनाकडे दाद मागावी लागेल त्याचा तपशिल मिळावा.  चारही मुद्यांची माहिती आरटीआय लोगोसह नंबरींगसह प्रमाणित करून माहिती मिळावी यासाठी आॅनलाईन अर्ज सामान्य प्रशासन विभागाला पाठविलेआहे.नुकतेच राज्य शासकीय कर्मचार्यांनी जुन्या पेंशनसाठी ‘एकच मिशन जूनी पेंशन’ असा नारा देत आठवडाभर संप पुकारला होता.  या आंदोलनात सहभागी झालेल्यांना ‘असाधारण रजा’ मंजूर करण्यांचा शासन निर्णय निघाला, त्यामुळे या कर्मचार्यांना संप काळातील पगारावर पाणी फेरावे लागले. या पार्श्वभूमीवर, विठोबा लच्छीराम ध्यानधान यांनी गुवाहाटीत गेलेल्या, आणि त्या कालावधीत जनतेची कामे विस्कळीत झाल्यांचा आरोप करीत माहिती मागीतली आहे. जुनी पेंशन मिळावी यासाठी संपात सहभागी लोकसेवकांवर शासनाने दिनांक 13 मार्च 2023 रोजी परिपत्रक काढून शासकीय कामकाज सोडून संपात सहभागी होणार्या लोकसेवकांवर शिस्तभंगाचे कारवाईसह 'काम नाही, वेतन नाही" हे धोरण अवलंबीले होते.  त्या अनुषंगाने आपले कामकाज व राज्य सोडून एक महिणा गुवाहाटीला गेलेल्या राज्यातील जनतेच्या करातून वेतन घेत असलेल्या लोकप्रतिनिधी आमदारांच्या बाबतीत मुद्देनिहाय माहिती मागीतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!