मरणाचे लाकड घेऊन येणारा युवक जागीच ठार
अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक घटना..
माझी पंचायत समितीचे सभापती चंदूभाऊ मारगोनवार यांचा पुतण्या नयन मारगोनवार 20 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली मृतक हा बेंबाळवरून मरणाचे लाकडं ट्रॅक्टरवरून घेऊन जात असताना ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता अचानक खाली पडल्याने पायाला तसेच छातीला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
बेंबाळ येथील बोमनवार यांच्या मृत्यु झाला मृत्तकाच्या अंत्यसंस्कारसाठी मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांचे पुतणे नयन मारगोनवार हे ट्रॅक्टरने लाकडे घेवुन नदीकडे जात होता, दरम्यान नयनचा टॅक्टरवरून तोल गेल्याने तो टॅक्टरच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाला, त्याला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्त घोषित केले.
मूल शहरांमध्ये वास्तव्याला असलेले माजी पंचायत समिती सभापती चंदूभाऊ मारगोनवार यांचा खास पुतण्या. त्यांचा पश्चात आई,वडील दोन बहिणी तसेच बराच मोठा मारगोनवार परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाला दुःख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना मूल मित्र परिवाराकडून केली जात आहे.
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!