कर्मचारी दोन इमारत प्रशस्त - पशुविभागाकडून पशुपालकांना सुविधेचा अभाव



कर्मचारी दोन इमारत प्रशस्त - पशुविभागाकडून पशुपालकांना सुविधेचा अभाव 
सावली (विजय कोरेवार) - सावली तालुका स्तरावर निर्माण होणारी प्रशस्त इमारत बघून वाटेल की अनेक कर्मचारी या ठिकाणी सेवेत असतील मात्र ही इमारत पशुवैद्यकीय दवाखान्याची असून मंजूर पदानुसार दोनच कर्मचारी राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रशस्त शासकीय इमारतीची गरजच काय अशी चर्चा पशुपालकांत आहे.
        सावली तालुक्यात कृषीशिवाय दुसरे उदरनिर्वाहाचे साधन नाही. कृषीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे बघितल्या जाते. शेतात यंत्रांचा वापर वाढल्यामुळे, गुरे चरण्यासाठी पडीक जमीन नसल्यामुळे, जंगलालगत वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्यामुळे पाळीव पशु कमी झाले आहे. शासनानेसुद्धा पशु वाढले पाहीजे, विभागाची पदभरती व योजनांकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. योजना राबवितांना अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशी राबविल्या जाते.
   मात्र या विभागाचे बांधकामाकडे कायम लक्ष आहे. सध्या सावलीत तयार झालेली इमारत लश वेधून घेत आहे. इमारतीकडे पाहून इथे अनेक कर्मचारी राहत असत असे वाटते मात्र हा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 असून सहाय्यक पशुधन अधिकारी व परिचर हे दोनच पद मंजूर व कार्यरत आहेत. सावली तालुक्यात 13 पशुवैद्यकीय दवाखाने असून पंचायत समिती स्तरावर पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी असे 14 पदे मंजूर असून बोथली , उपरी, व्याहाड बूज, सामदा येथे रिक्त पद आहेत तर 6 परिचर पद रिक्त आहेत. जवळपास सर्वच दवाखान्यात अधिकारी कर्मचारी वसाहती इमारती आहेत परंतु 90 टक्के ठिकाणच्या इमारती रिक्त असून अधिकारी बाहेरून ये जा करीत असतात. चिचबोडी येथील नवीन वसाहतीच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या व इतर साहित्य चोरीला गेले मात्र कुठेही तक्रार नाही. जिबगाव येथे निवासी इमारत बनल्यापासून लायटिंगची सोय न झाल्याने कोणीच निवासी राहिले नाही , शेजारील लोक कबाडी वस्तू त्यात ठेवतात. त्याचा ताबा कोणाकडे आहे हेही कोणी सांगत नाही. अशा पद्धतीने पशु विभागात शासनाच्या करोडो रुपयाच्या निधीचा चुराडा होत असतांना पशुपालकांना  कोणत्याही सुविधा योग्य मिळत नाही. 
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!