एका कुत्राने एकाच दिवसी केले 9 जनाना जख़्मी
एका कुत्राने एकाच दिवसी केले 9 जनाना जख़्मी
मुल मारोडा येथील एका लावारिस कुत्र्याने 7 एप्रिल 2023 या एकाच दिवशी तब्बल आठ व्यक्तींना तसेच एका बैलाला जखमी केलेले आहे. त्यापैकी साहिल सचिन गेडाम (वय 7 वर्ष ), कु.अनुष्का वाळके ( वय 3 वर्ष ), बेबीताई वाळके ( वय 50 वर्ष ) यांची प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. यश रंजन कोल्हे ( वय 24 वर्ष ), सुरेश सोनटक्के ( वय 50 वर्ष ), व इतर व्यक्ती किरकोळ जखमी आहे. त्या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने गावातील काही तरुण युवकांनी त्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला मारले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!