बाल संगोपन योजनेत मिळणार 2250 रुपये दरमहा - आई किंवा वडीलाचा मृत्यू झालेल्या मुलांसाठी लाभ
बाल संगोपन योजनेत मिळणार 2250 रुपये दरमहा - आई किंवा वडीलाचा मृत्यू झालेल्या मुलांसाठी लाभ
सावली (प्रतिनिधी) - आई किंवा वडील मृत्यू पावल्यास, आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त, एड्स या दुर्धर आजाराने असल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बाल संगोपन योजना असून या योजनेतील अनुदानात वाढ होऊन प्रत्येक मुलास 2250 रुपये दरमहा मिळणार आहे.
बालसंगोपन योजना ही एकल पालकांच्या मुलांसाठी राबवली जाते. या योजनेत पूर्वी 1100 रुपये मिळत होते ते एप्रिल पासून 2250 रू मिळणार आहेत. तेव्हा आपल्या आजूबाजूच्या विधवा महिला व अनाथ बालकांना ही योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
ही योजना कोणाला मिळते..?
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील मृत्यू पावले आहेत अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा HIV बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्याच्या मुलांना ही योजना मिळते.
वयाची अट काय आहे ?
अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला दोघानाही प्रत्येकी 2250 रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
यासाठी उत्पन्न अट किती आहे ?
पालकाचे उत्पन्न एक लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे
अर्ज घेवून कोठे जावे ?
अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडे दाखल करावा.
या अर्जाला कोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे ?
याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांचेकडून घ्यावा
१) योजनेसाठीचा विहीत नमुन्यातील अर्ज
२)पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेराँक्स
३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखाचे आतील.
५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्युचा दाखला
६) पालकाचा रहिवासी दाखला.
(ग्रामपंचायत /नगरपालिका यांचा)
७) मुलांचे बॅक पासबुक झेराँक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक
९) रेशनकार्ड झेराँक्स .
१०) घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड मापाचा रंगीत फोटो ( दोन मुले असल्यास दोन्ही मुलासोबत पालकाचा स्वतंत्र फोटो )
१०) मुलांचे ३ पासपोर्ट फोटो
दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवावे
माहितीसाठी संपर्क साधा
आपल्या परिचयाच्या या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा व ही योजना मिळवून द्यायला मदत करावी. दोन मुले असतील तर दर महिन्याला ४५००रुपये या मुलांना शिक्षणासाठी मिळू शकतील..
अर्जासाठी किंवा यासंबंधित माहितीसाठी संपर्क साधा.
श्री. लोणारे बाल संरक्षण अधिकारी
8668765592
श्री. विजय कोरेवार
माजी सभापती पं. स . सावली
9764168474



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!