८मार्च महिला दिनानिमित्त लेख
८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिलादिन म्हणुन साजरा केला जातो. महिलादिन म्हणजे काय तर महिलांचा आदर करण्याचा दिवस , तर हा एकच दिवस महिलांचा आदर करायचा का ?
महिला म्हणजे स्त्री , स्त्रीचा आदर हा एक दिवसांपुरता मर्यादित न राहता वर्षातील ३६५ दिवस करायचा आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत पुरातन काळापासुन स्त्रीचा आदर , सन्मान केला आहे.
म्हणुनच आपल्या भारतभुमीत शिवबा सारख्या राजाला जन्म देणारी जिजाई, पाठीला लहान बाळाला बांधुन शत्रुशी लढणारी राणी लक्ष्मीबाई , पतीच्या निधनानंतर राज्यकारभार सांभाळणारी राणी अहिल्याबाई होळकर अशा कितीतरी महान स्त्रियांनी जन्म घेतला. ज्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी इतिहास गाजवला.
स्त्रीने मनात आणले तर ती काहीही करु शकते,कारण स्वतः श्री दुर्गामाता प्रत्येक स्त्रीमध्ये कार्यरत असते.
ती आजच्या वैज्ञानिक युगात प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. पायलट पासुन तर बसकंडक्टर, आटोरिक्षा,कार , ट्रक सर्व वाहने ती चालवत आहे. मैदानातील प्रत्येक खेळ ती खेळत आहे.
भारताच्या पंतप्रधानांपासुन तर राष्ट्रपती पदापर्यंत ती कार्य करत आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनीआपले नाव काढले आहे. एवढेच नव्हे तर कुटुंबात सुद्धा ती आई ,बहिण, वहिनी, आत्या ,काकु ,मामी , सासुबाई ,आजी असे अनेक नाते मोठ्या कुशलतेने निभावते.तिच्यामुळेच कुटुंबामध्ये प्रेमभाव टिकुन असतो.
म्हणुनच एका लेखकाने म्हटले की देवाला सुद्धा स्त्री ला बनविताना किती दिवस लागले असेल. असा स्त्रीचा कितीही महिमा गायला तरी कमीच आहे. आम्हा सर्व स्त्रियांना गर्व आहे की देवाने आम्हाला स्त्री म्हणुन जन्म दिला.
आपल्या स्त्रियांनी आता एकच ध्येय ठेवले पाहिजे की आपल्या मुलांना आपल्या धर्माबद्दल आदर शिकवणे, आपली संस्कृती शिकवणे, आपल्या भारत देशाबद्दल इतकी देशनीष्ठा साठुन भरवणे की उद्या आपल्या देशावर कोणतेही संकट आले तर आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहणार नाही . जिजाबाईंसारखी माता आपल्याला बनायचे आहे. की ज्यामुळे आपला भारत देशावर कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही.
आज महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच सांगु इच्छिते.
आता अबला नको तु सबला हो ,
चंडी ,दुर्गा काली हो
!! आजच्या महिला दिना च्या सर्वांना
खुप खुप शुभेच्छा !!
सौ.भारती जीवन कोंतमवार ,मुल



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!