महिला दिन विशेष
“स्त्री “, या शब्दाला व्यापक अर्थ आहे. कारण एकच स्त्री अनेक प्रकारच्या भूमिका निभावत असते ,ती कोणाची तरी आई असते, बहीण अस ते , पत्नी असते तर कोणाची मैत्रीण असते या सर्व भूमिका निभावतानाच आपला समाज घडत असतो. एक स्त्री साक्षर झाली तर ती तीच कुटुंब साक्षर बनवते कारण कुठल्याच साक्षर आईला आपली मूलं शिकू नये असं वाटत नाही . स्त्री हिच खरी समाज घडवण्यास मदत करत असते परंतु स्त्री चे हे कार्य पुरुषप्रधान संस्कृतीने कधीच मान्य केलं नाही स्त्री काय करते ? घरातले चार कपडे, भांडी धुणे व जेवण एवढंच तर काम असत तर, खरंच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सुखी झाल्या असत्या दर महिन्याच्या खर्चाच्या हिशोबचा ताळमेळ घालवताना स्त्रियांचा होणारी दमझाक , कारण महिन्याचे बजेट आणि होणारी घालमेल,व्यवहार असो की घरातील मुलांचा असो की इतर मंडळींचा मुड हे सर्व सांभाळण्याची कसरत महिलांनाच करावी लागते.क्वचित पुरुष लक्ष देतात,पूर्वीचा काळ व आजचा काळ यात बराच फरक आहे.पूर्वी स्त्रिया या घरी राहत होत्या.,आता त्या नौकरी करतात.खरया अर्थाने ती स्वंतत्र झाली असे आपण म्हणतो,,पूर्वी फक्त घरातील कामे राहत असत ते झाले की मोकळी असायची,पण आता स्त्री पुरुष दोघेही जॉब करतात,घरी आले की फक्त स्त्री ही स्वयंपाक ,मुलांचा अभ्यास ,घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी ही सर्व कामे स्त्री ने करायची काय तर ती आहे परंपरा! सर्व कामे स्त्री ने करावी हा आग्रह अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीला धरून वागणारा समाज.स्त्रीला जर एखाद्या पतीने मदत केली तर तो बायकोचा गुलाम..किती सूंदर नावं..आपण जेव्हा एखाद्या हॉटेलात जेवायला जातो तेव्हा तिथे कुक हे पुरुषच असतात,एखादा लग्नप्रसंग असो की,कार्यक्रम जास्तीत जास्त आचारी पुरुष असतात.ते जेवण सर्व आवडीने खातात ,मग घरात आपल्या जिवन संगिनीला मदत केली तर इतकं वाईट का वाटावं.स्त्री हिच घरातील कामे करणार हा गोड गैरसमज आहे.घरातील स्त्री जेव्हा घर सांभाळते म्हणजे ती एक प्रकारचे समाजकार्य आहेच की,तिचा पण सन्मान करायला हवा.तिचापण आदर केला ती कधीच थकनार नाही आपल्या माणसांनी केलेली स्तुती कोणत्या स्त्रीला आवडणार नाही.
या महिला दिनी पुरुष वर्गाने स्वतःच्या घरातील स्त्रियांना सन्मान घ्यावा हीच महिलांना महिला दिनाची छान भेट होऊ शकते असे मला वाटते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!