आमदार बंटी भांगडिया यांच्यावरील खोट्या गुन्ह्यांचा निषेधार्थ ब्रम्हपुरीत मोर्चा
ब्रम्हपुरी : चिमूर विधानसभेचे लोकप्रिय व विकासपुरुष आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ ) भांगडिया यांचे चरित्र मलीन करण्याच्या दृष्टीने आणि राजकीय सुढ बुद्धीने त्यांचेवर चिमूर पोलिस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी गुन्ह्याचा निषेध दर्शविण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका ब्रम्हपुरी (चिमूर विधानसभा) च्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आमदार भांगडिया वरील गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले . आयोजित केलेल्या मोर्चाला क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामान्य जनतेनी उपस्थितीत राहून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे समर्थनार्थ आपला पाठिंबा दिला. त्वरित गुन्हे मागे न घेतल्यास यापेक्षाही उग्र असा आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनी यावेळी दिला. या मोर्चाला भारतीय जनता पार्टीचे वसंत वार्जुरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, दिपक उराडे माजी तालुका अध्यक्ष भाजपा, बंडू जावळे माजी व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष भिशी,विलासज उरकुडे,उमाजी कुथे,मनोज ढवळे, ममताताई कुंभारे,सुनीताताई ढोरे, दिपालीताई मेश्राम, रवींद्र मेश्राम,अक्षय चहांदे, नरेंद्र राखडे,धनंजय नाकतोडे, सुधीर दोनाडकर ,गजानन गडे,शरद कुथे,अमरदीप राखडे,सिदेश भार्रे, श्याम बावनकुळे,प्रभाकर शेंडे,स्वप्नील अलगदेवे,सौरभ लांजेवार, सुनील राऊत,पितांबर ठेंगरी,मोरेश्वर दर्वे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!