माणूस
माणूस
धर्म धर्म काय करतो तोड धर्माच्या बेड्या
माणूस म्हणून माणसाला जगू दे ना वेड्या
जन्म घेतला अवनीवरती घडवत जाते कर्म
रंग वेगळा भेद सांगूनी मिरवत येतो धर्म
आकाशाच्या छताखाली उगा कशाला खोड्या
माणूस म्हणून माणसाला जगू दे ना वेड्या
नर नारी आधार जगाचे निसर्ग अनमोल मोती
धर्म सांगते मानवता मग कोठून आल्या जाती
जाती पातीच्या भिंतीवरूनी विभक्त पडल्या जोड्या
माणूस म्हणून माणसाला जगू दे ना वेड्या
मंद मंद वारा तसाच झुळूक पसरते गंध
निर्मळ जल ढवळून सारे कसे बनावे अंध
एक ढंगाचा लाल रंगाचा रुधिर वाहते नाड्या
माणूस म्हणून माणसाला जगू दे ना वेड्या
वाद घालुनी गर्व फुकाचा पिळत बसतो मिशा
चंद्र आपला सूर्य तापला देती जगण्याची दिशा
साद घालता एकीची मग सोबत चाल रे गड्या
माणूस म्हणून माणसाला जगू दे ना वेड्या
🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!