चोर

चोर 

हातात झोरा मला भिकारी वाटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला
ओरडलो असा फक्त तर्क लावूनी
आंधळे कधीचे त्यांना घाम फुटला

जात बगळ्याची बरी ध्यान करते
गरी कशाला चोचीत मासा मरते
उलट्या पाट्यावर मसाला कुटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

काळ्या मनातले ढोंग पांढरे
लाह्या कुणाला कोण जोंधरे
फुटक्या ढोबरात जाळ पेटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

बुद्ध गेला चोरीला सुन्नी पंढरी
संत उरले नावाला दाढी पांढरी
एकाजागी राहून विठ्ठल गोठला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

जाग्यावर बोंबलुन मेला खरा चोर
चौकीदार ठेवला साऱ्यालाच घोर
 बाँब सुतळीचा  तो फुसका पेटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

दोन हजार हजाराचे जादू करतो
उभा रांगेत उपाशी विकत मरतो
आंधळे पुतळे तसा जिवंत सुटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏
जुनासुर्ला , ता . मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!