हेल्पिंग हँड्स च्या"वारसा प्रबोधनाचा " स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न
चंद्रपूर( प्रतिनिधी )-
हेल्पिंग हँड्स टीम वन या सामाजिक संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेली वारसा प्रबोधनाचा या स्मरणिकेचे प्रकाशन संत गाडगेबाबा जयंतीदिनी संपन्न झाले .
जेल मार्गावरील सोमेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात या स्मरणिकेचे प्रकाशन सुप्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंकी (अमरावती ), डेबू सावली वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ शिंदे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्मरणिकेचे संपादक इंजि. प्रदीप अडकिने, पत्रकार राजेश भोजेकर, सौ. भारती शिंदे, झाडीपट्टी नाट्यकलावंत सौ. निशा धोंगडे, कु. सान्वी तुराणकर आदींच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, समाज जीवनात परिवर्तनाचे कार्य करणाऱ्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांना दिशा देणारा हा वैचारिक ग्रंथ आहे , येथील लेखांचे मूल्य पाहू जाता हा संशोधन ग्रंथ ठरावा, असे ते म्हणाले. दिलीप सोळंकी यांनी संपादक प्रदीप अडकिने यांचे कौतुक करून ते म्हणाले की , समाजातील वाढती अंधश्रद्धा लक्षात घेता अशा प्रकारच्या वैचारिक ग्रंथांची आवश्यकता आहे . समाज जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या दृष्टीने हे कार्य महत्त्वाचे आहे ,असे ते म्हणाले. सुभाषभाऊ शिंदे यांनी सुद्धा ग निर्मिती कार्याबद्दल समाधान व्यक्त करून हेल्पिंग हँड्स टीमच्या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी हेल्पिंग हँड्सचे सहसंयोजक विलास कोहळे आणि संजय राठोड यांचा अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्तावना आणि सूत्रसंचालन अरुण भोस्कर यांनी केले. यावेळी संत गाडगेबाबा विचार मंच, महाराष्ट्र डेबुजी फोर्स आणि डेबुजी बहुउद्देशीय समाज विकास संस्थेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!