महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चंद्रपूर येथे सुसंस्कार विषय पालकांचे प्रबोधन संपन्न

     
                   
मूल प्रतिनिधी 
      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी श्री शेखर लिमजे यांच्या घरी, महाकाली वार्ड ,चंद्रपूर येथे सुसंस्कारित पिढी घडविण्यामध्ये पालकांची भूमिका, या विषयावर मार्गदर्शन  करण्यात आले*.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
     भावी पिढी वर चांगले संस्कार होऊन ते देशाचे चांगले नागरिक बनावे या व्यापक उद्देशाने पालकांसाठी हे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  *सौ प्रीती लिमजे* यांनी परिश्रम घेतले . या उपक्रमासाठी  *सौ.दिपाली सिंगाभट्टी* यांचे  सहकार्य लाभले .
    *या मार्गदर्शनाचा लाभ एकूण १२  पालकांनी घेतला* .
                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!