जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात नॅशनल अप्रेंटिशिप अवेअरनेस वर्कशाप चे आयोजन




 चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
     व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे वतीने चंद्रपूर सिव्हिल लाईन स्थित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात (शास.आयटीआय जवळ)  येत्या ९ फेब्रुवारी ला सकाळी १०  ते सायंकाळी ५  या दरम्यान एक दिवशीय नेशनल  अप्रेंटिशीप अवेअरनेस वर्कशाप  चे  आयोजन करण्यात आलेले आहे.  या कार्यशाळेत चंद्रपूर ,गडचिरोली आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यातील उद्योजक व माजी प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. करिता या  अवेअरनेस वर्कशॉप चा लाभ संबंधितांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  श्री. रविंद्र मेहेंदळे यांनी एका पत्रान्वये  केलेले आहे . या वर्कशॉप मध्ये‌ बोट , आरडीइएस ,एमएसएमई  विभागाचे वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी अप्रेंटीस नोंदणी व नियमावली    संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!