चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावर भिशन अपघात

कामगार जागेवरच ठार

उप संपादक
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर ते वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे काम कासवाच्या गतीने सुरु असून या महामार्गाने ओव्हरलोड ट्रक वाहनाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असून सेफ्टी च्या बाबतीत कुठल्याही सोई सुविधा कंत्राटदार यांनी महामार्गावर लावलेल्या नाही म्हणून सर्रास नियमांचे उल्लंघन या महामार्गावर केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कधीच याकडे लक्ष देत नसल्याने अपघातांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत चाललेली आहे.अशातच भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रक ने चिमूर वरून १२ कि.मी अंतरावर असलेल्या खडसंगी हिंगणघाट टी पॉईंट वर आज कामगारास धडक मारून ठार केले घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!