व्याहाड बूज. ग्रामपंचायतीवर धडकणार मोर्चा - जनतेनी सहभागी होण्याचे काँग्रेसचे आवाहन
सावली - ग्रामपंचायत व्याहाड बूज. यांच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध ग्राम काँग्रेसने आंदोलनाचे आयोजन केले असून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथे अनेक दिवसापासूनच्या विविध समस्या प्रलंबित आहे . नळ योजना बंद आहे . ही नळ योजना १ मार्च पर्यंत सुरू झालीच पाहिजे . तसेच व्याहाड बूज. येथील ग्रामपंचायतची नळ योजना जेवढे दिवस बंद राहील तेवढे दिवसाचं पाणी कर माफ करण्यात यावा. ( पाणी नाही तर कर नाही ). तसेच येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रोड खोदून टाकण्यात येत असलेली पाईपलाईन अंदाज पत्रकाप्रमाणे खोदून टाकण्यात यावी , व्याहाड बूज. ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेली बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याने जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत चौकशी करण्यात यावि, ग्रामपंचायत मार्फत 15 टक्के मागासवर्गीय योजनेअंतर्गत पाण्याचे कॅन गरजूना वाटप न करता नियमबाह्य वाटप केले त्या पाण्याच्या कॅन सर्व अपंग व विधवा महिलांना वाटप करण्यात यावे, ग्रामपंचायत व्याहाड बूज. चे उपसरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्थाई दोन मालमत्ते पैकी एकाच घरावर कर सुरू केलेला आहे तरी उर्वरित बाकी त्यांच्या मालमत्तेवर कर लावण्यात यावे . या सर्व मागण्यांसाठी दिनांक ४ मार्च ला व्याहाड बूज. ग्रामपंचायत वर काँग्रेस पक्षातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या मोर्चात व्याहाड बुजच्या नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे सुनील बोमनवार , सचिन इंगुलवार , जयंत संगीडवार , दीपक गद्देवार , चेतन मोटघरे , संजय चांदेकर , अनिल गुरनुले तसेच सर्व प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाहन केलेले आहेत .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!