श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांची गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या राजुरा विधान सभा क्षेत्र संघटक पदी नियुक्ती


 


राजुरा / प्रतिनिधी 

श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांची गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या राजुरा विधानसभा क्षेत्र संघटक पदी नियुक्ती झाली असून घनश्याम मेश्राम हे श्रमिक एल्गार संघटनेत मागील 20 वर्षांपासून कार्यरत असून त्यांचा सामाजिक कार्यात दांडगा अनुभव असून आदिवासींच्या अनेक प्रश्नावर काम ते करीत आहेत , मूर्ती येतील कोलामांचे प्रश्न, जिवती येथील आदिवासींच्या वनहक्क पट्याचे प्रश्न, बेरडी येथील प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न ते अनेक वर्षापासून सोडविण्याचा प्रयत्न करीत असून अनेक मोर्चे, आंदोलने करून शासनाला वेठीस धरण्याचा काम करीत आहेत. 

वनहक्क, आदिवासींच्या जमिनीचे प्रश्न,अतिक्रमान जमीन पट्टे, निराधारांचे प्रश्न, बांधकाम मजूर प्रश्न, घरकुलांचे प्रश्न,  जिवती तालुक्यातील कोलामांचे प्रश्न असे अनेक प्रश्नावर ते कार्य करीत असून त्यांची स्वतःची ट्रायबल डेव्हलोपमेंट कल्चरल फोंडेशन ही संस्था सुद्धा मेश्राम यांनी स्थापन केली असून आता राजकारणाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे मत मेश्राम यांनी व्यक्त केले, मेश्राम यांचा गोंडवाना गणतंत्र पार्टीला निश्चतच फायदा होणार असल्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!