धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून मागासवर्ग आयोग सदस्यांची भेट - झाडे कुणबी प्रश्नावर चर्चा
महाराष्ट्र राज्यातील मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍड. चंद्रलाल मेश्राम,
डॉ. निलिमा सरप , प्रा. डॉ. गोविंद काळे हे गडचिरोली जिल्ह्याचे दौऱ्यावर आहेत. या सदस्यांची धनगर समाज शिष्टमंडळांनी भेट घेत चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुनबी, झाडया, झाडी हे धनगर जमातीतील तत्सम जात "झाडे" या नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत बोगस जात प्रमाणपत्र मिळवीत शासकीय नोकरी व इतर सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खऱ्या धनगर जमातीवर अन्याय होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मागासवर्ग सदस्यांनी याबाबत आमदार पडळकर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केले असल्याने मार्च महिण्यात गडचिरोली येथे बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी शिष्टमंडळात धनगर समाज अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नारायण करेवार, कोषाध्यक्ष वसंत मेडेवार. संघटक उपशिक्षणाधिकारी रमेश उच्चे, सुरेश डंकरवार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!