नामांकित रेती घाटावर चोरट्या रेती तस्करांचा महा धुमाकूळ..
नंबर नसलेल्या ट्रॅक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक...
शेगाव... जगदीश पेंदाम
भद्रावती ,वरोरा तालुक्यातील पारोधी,आष्टा ,अर्जुनी,तुकुम धानोली रेती घाटातून रात्रोला मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाच्या रेती तस्करी मध्ये वाढ झाली आहे. रेतीचे भाव सोन्यासारखे वाढली असून प्रति ट्रॅक्टर 6 ते 7 हजार रु. रात्रीला घरपोच विक्री केल्या जात आहे...
सविस्तर असे की चोरट्या मार्गातून येणाऱ्या रेतीची संबंधित अधिकाऱ्यांसोबत साठगाठ बांधून असल्याने प्रत्येक ट्रॅक्टरच्या मागे रेती तस्कर दलाला एक हजार रु द्यावे लागते अन्यथा परिणाम गंभीर असल्याचे बोलल्या जाते एक ट्रॅक्टर पोलीस ,महसूल विभाग, व वन विभागाच्या गचाट्यात सापडले की रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर कायद्यानुसार सुटेल याची गॅरंटी फारच कमी असल्याने रात्री पासून ते सकाळी 4 वाजे पर्यंत मोठ्या प्रमाणात चारही घाटातून राज रोस पणे रेती तस्करी सुरू असल्याने झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक पटवारी, ग्रामसेवक, पोलीस, विभागाने भरारी पथक तयार करून या भागातील रेती दलाल व चोरी करणाऱ्या तस्करांवर कारवाई करावी व सर्व चारही रेतीघाट जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी लिलावात काढून घरकुले व इतर बांधकामे करणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी घरकुलाचे गरजू नागरिक करीत आहे.......


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!