सावली तालुक्यात काँग्रेसचे "हाथ से हाथ जोडो अभियान" ला सुरवात
सावली - भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्र काँग्रेसने हाथ से हाथ जोडो अभियानाला सुरवात केली असून आमदार विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात सावली तालुका काँग्रेसच्या वतीने या अभियानाला सुरवात करण्यात आली.
भाजप प्रणित केंद्रशासन व राज्यशासनाचे धोरण लोकशाही विरोधी असून सामान्य नागरीक, शेतकरी, बेरोजगार यांना देशोधडीला लावणारे आहे. देशात गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ, खताची दरवाढ याबाबत नागरिकांना जागृत करण्याचे काम अभियानातून करण्यात आले. सावली तालुक्यातील रुद्रापूर, कवठी आणी पारडी या गावात अभियान राबविण्यात आला.
या अभियानाला तालुकाध्यक्ष नितीन गोहणे यांचे नेतृत्वात सुरवात करण्यात आली. यावेळी महिला तालुकाध्यक्ष उषा भोयर, प.स.सावलीचे माजी सभापती विजय कोरेवार, सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, सावली न.प.च्या नगराध्यक्षा लता लाकडे, सावली शहराध्यक्षा भारती चौधरी, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल, सावलीचे नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन संगीडवार, नगरसेविका ज्योती शिंदे, साधना वाढई, अंजली देवगडे, बोथलीचे उपसरपंच नरेश गड्डमवार, अनिल गुरुनुले, कविता मुत्यालवार, शिला गुरुनुले, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कमलेश गेडाम पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!