सरपंचा शर्मीला रामटेके यांना वसुधा स्मृती पुरस्कार
तलोधी (बा.)
ग्रामस्तरावर विविध शैक्षणीक, सामाजीक, व विकासाभिमुख योजना, उपक्रम राबवुन नवेगाव पांडव ला मुंबई पर्यंत पोहोचविणारी उच्च शिक्षा विभूषित सरपंचा शर्मिला रामटेके यांना मानाचा 'वसुधा स्मृति पुरस्कार घोषित करणयात आला आहे.
सदर पुरस्कार प्रक्रिति या प्रसिद्ध पर्यावरणवादी संस्थेतर्फे विदर्भातील तिन महिला सरपंचांना देण्यात येणार आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या टाटा मैराथन मुंबई या नामांकित स्पर्धेत महाराष्ट्रातील निवडक १३ महिला सरपंचामधे अॅड. शर्मिला रामटेके
यांची निवड झाली होती हे विशेष.
याआधी रामटेके यांना *विदर्भ भूषण'* या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२३ ला नागपूर येथे मैगामेसे अवार्ड विजेते राजेन्द्र सिंह यांचे हस्ते वसुधा स्मृति पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. या बहुमानाबद्धल राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांनी शर्मीला रामटेके यांचे अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!