तलाठी साझा पूर्ववत ठेवा - काँग्रेस शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सावली - राजोली फाल हे पूर्वी बोथली तलाठी साझ्यात होते. मात्र हे गाव वाढीव तलाठी साझाच्या प्रक्रियेत बोथली पासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असतांना 15 किमी अंतराच्या चक विरखल तलाठी साझात समाविष्ट केल्याने पूर्ववत बोथली तलाठी साझात करा अशी मागणी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहाणे यांच्या नेतृत्वात राजोली फाल येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
फाल हे सावली तालुक्यातील सहाशे(६००) लोकवस्तीचे गाव आहे. सदर गाव हे जंगलाचा आहे. आजूबाजूला जंगल असून नेहमीच वाघाची दहशत या परिसरात असते.या गावातील लोक वाघाच्या भीतीने दहशतीत असतात आणी म्हणून सदर गावाचा समावेश इतर तलाठी साझ्यात करण्यात येऊ नये. राज्यशासनाने तलाठी साझे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सावली तालुक्यात सद्यास्थितीत १७ तलाठी साझे असून अजून नवीन ८ तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत.त्यात चकविरखल हे नवीन तलाठी साझाचा समावेश आहे.त्यात राजोली फाल या गावाचाही समावेश करण्यात आला आहे.चकविरखल ते राजोली फाल हे अंतर जवळपास १५ कि.मी.चे आहे.हा प्रवास लोकांना भविष्य काळात त्रास दायक होईल अशी भूमिका गावकाऱ्यांनी घेतलेलि आहे.
पूर्वी राजोली फाल बोथली साझ्यात समाविष्ट होते.त्यामुळे नागरिकांना त्रास करावा लागत नव्हता.आता राजोली फाल हे गाव चकविरखलं या १५ कि.मी. दूर असलेल्या गावात समाविष्ट केल्यामुळे महसूली कामे करताना त्रास सहन करावा लागणार आहे.दरम्यान राजोली फाल या गावाचा समावेश तलाठी साझा बोथली येथे न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा राजोली फाल येथील नागरिकांनी दिला आहे.
उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वस्तूस्थितीची माहिती करून योग्य ती कार्यवाही केल्या जाईल अशे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. पुढील काय कार्यवाही होते.याकडे गावकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
या वेळी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळातून सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे,राजोली फाल चे माजी सरपंच श्यामराव बाबणवाडे, गावाचे पोलीस पाटील बंडू बाबणवाडे,हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके, प्रदीप कोरडे व गावकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!