Phc ची ईमारत करोडो रुपये खर्च करून पडली धुळखात...


.

प्रशासन आणि आरोग्य विभाग याकडे लक्ष देतील का?

शेगाव.. (जगदीश पेंदाम)

वरोरा तालुक्यातील शेगाव हे गाव वरोरा ते चिमुर तालुक्याच्या मुख्य नॅशनल हायवे 353 रस्त्यावर बसलेले असून या ठिकाणी तालुक्यातील मोठी 13 सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे  या गावाची लोकसंख्या दहा हजारच्या वर असून परिसरातील 70 ते 80 गावातील लोकसंख्या 50000 च्या जवळपास येत असते शेगाव गावातुन आतापर्यंत चार जिल्हा परिषद सदस्य,तसेच एक प.स.उपसभापती परिसरातून जनतेने निवडून दिले असून या ठिकाणी सोमवारला मोठा बाजार भरत असतो तसेच मोठी बाजारपेठ म्हणून वरोरा 
तालुक्यात ओळख आहे...
 
जवळपास या ठिकाणी परिसरातील लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पाहले येथे एक पोलीस स्टेशन,10 ते 12 प्रायव्हेट दवाखाने, 15 ते 20 फार्मसी, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे ऑफिस, फॉरेस्ट ऑफिस, दोन पेट्रोल पंप,तर इंडियन बँक, ग्रामीण कोकण बँक ,जिल्हा मध्यवर्ती बँक, पंधरा ते सतरा कृषी केंद्र इतर व्यापार मोठ्या प्रमाणात पसरलेला पहायला मिळते तर वरोरा तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे गावात 100% निधी खर्च करून पी.एस. सी. चि नवीन इमारत बांधकामा करीता जवळपास दोन कोटी खर्च लावून मागील पाच वर्षापासून ईमारत धुळखात शोभेची वस्तू बनली आहे..
याकडे प्रशासन आणि आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे दिवसेंदिवस जनतेला आरोग्याच्या प्रश्न मोठा भेडसावत असून परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आरोग्याच्या विचार केल्यास प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये उपचार घेणे त्यांना परवडण्यासारखे नाहीच,याचाच फायदा घेत बोगस डॉक्टरांनी ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फिरून उपचार करताना दिसून येतात, या इमारती बांधकामाला जवळपास पाच वर्षाचा कालावधी लोटूनही इमारतीला मुहूर्त सापडेना, तसेच या ठिकाणी इमारतीच्या वापर नसल्यामुळे प्रेमी युगलांचा, दारुड्यांचा व जुगार खेळणार यांचा अड्डा ही ईमारत बनलेली आहे, इमारतीमध्ये ठिकठिकाणी दारूचे बॉटल, जुगार खेळण्याचे कार्ड व निरोध चे पॉकेट आढळून येतात तसेच तसेच परिसरात गवत वापरले असून येथे सौच करून परिसराथ घाण केल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळेच या इमारतीचा मुहूर्त प्रशासनाला कधी ठरणार असे जनतेतून बोलल्या जात आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!