मूलच्या बस स्थानकावर खाजगी वाहनाचा कब्जा
मूल शहरात नव्यानेच होत असलेल्या बस स्थानकाच्या अगदी गेट समोर खाजगी ट्रॅव्हल्स व इतर प्रवासी वाहने लावली जात असल्याने या बस स्थानकावर खाजगी वाहनधारकानी कब्जा निर्माण केला काय? असा प्रश्न आता चर्चिला जात आहे.
बस स्थानकापासून १०० मीटर दूरवर खाजगी वाहने ठेवण्याचा नियम असला तरी, मूल येथे खाजगी वाहनधारकांवर कोणाचेही नियंत्रण राहीले नसल्याने आता थेट बस स्थानकाच्या गेट समोर खाजगी वाहने लावून बस स्थानकांमधून प्रवाशाची उचल करीत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहे.
मुल येथे नवीन बस स्थानकाचे काम गतीने पूर्ण होत आहे. जुने गेट बंद करून नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. या गेट समोरील डिव्हायडर देखील तोडण्यात आलेले आहे. येथून वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास होत असतानाच, या बस स्थानकाच्या गेट समोरच खाजगी वाहनाने ताबा केल्याने एसटी महामंडळाच्या बसेसना बस स्थानकावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स, ऑटो, काळी पिवळी धारकाकडून प्रवाशासाठी होणारी कसरत, बसेस, ऑटो आणि दुचाकी वाहने यांची होणारे गर्दी यामुळे या परिसरा आता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!