राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे पुरस्कार जाहीर...




डॉ.अभिलाषा गावतुरे,एड.योगिता रायपुरे, पत्रकार लिमेश जंगम होणार सन्मानित!


बल्लारपूर प्रतिनिधी :-(धनंजय पांढरे )
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून,चंद्रपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे यांना त्यांचा सामाजिक योगदानासाठी 'राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार-२०२३,पत्रकार लिमेश जंगम यांना त्यांच्या निर्भीड पत्रकारीते बाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार गौरव पुरस्कार-२०२३' तर शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदानासाठी एड.योगिता रायपुरे यांना क्रांतीज्योति सावित्री फुले गौरव पुरस्कार-२०२३ जाहीर करण्यात आला आहे.२६ जानेवारी २०२३ रोजी बल्लारपूर येथील बल्लाळशाह् नाट्यगृहात होऊ घातलेल्या विभागीय पत्रकार सम्मेलनात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी  यांच्या  प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
          पुरोगामी पत्रकार संघाच्या विभागीय सम्मेलनाची जय्यत  तयारी सुरु असून या कार्यक्रमात विविध स्पर्धा,परिसंवाद,काव्य सन्मेलन आणि गौरव समारंभ आयोजित केला असल्याची माहिती पुरोगामी पत्रकार संघांचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!