श्रीमद् भागवत सप्ताह समिती तळोधी (बाळापुर) यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व रक्तदान शिबिर संपन्न.
तळोधी(बा)यश कायरकर
श्रीमद् भागवत सप्ताह समिती तळोधी (बाळापुर) यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती व रक्तदान शिबिर संपन्न झाला.
या कार्यक्रमाला *प्रमुख अतिथी म्हणुन सौ. मालतीताई उन्मेषजी गेडाम ,सरचिटणीस- कल्याण शिक्षण संस्था नागपूर, सौ.पुष्पलताताई काशिनाथ बोरकर , प्राचार्य जी.जे.बुलबुले- महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, प्रा. अतुल एन. कामडी या कार्यक्रमाला उपस्थित होते.*
याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे संयोजक प्रवीण वामनराव गिरडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच वैभव जिभकाटे,विकास बोरकर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गिरडकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रदर्शन वसंतराव बडवाईक यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!