गरजू महिलांना मदत करीत मकर संक्रांत साजरी - सावली महिला काँग्रेस कमिटीचा उपक्रम


सावली - मकर संक्रांतीचे औचित्य साधून सावली तालुका महिला काँग्रेसच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला व गरजू महिलांना साड्यांचे वाटप करीत मकर संक्रांत साजरी करण्यात आली.
     सावली तालुका महिला काँग्रेसच्या वतीने सावली शहरातील १७ प्रभागातील ७५ विधवा आणी निराधार महिलांना साड्या व लुगड्यांचे वाटप करण्यात आले.
      कार्यक्रमाचे उदघाटक महिला काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष उषा भोयर, नगरपंचायत नगराध्यक्ष लता लाकडे, नगरसेविका साधना वाढई, सिमा संतोषवार राधा ताटकोंडवार, प्रियांका रामटेके, ज्योती शिंदे, अंजली देवगडे, ज्योती गेडाम कविता मुत्यालवार, अंजली दमके,कमलेश गेडाम तालुकाध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया विभाग सावली, गावातील महिला, कार्यकर्ते  आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिमा संतोषवार तर आभार अंजली देवगडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!