सादागड हेटी येथील तलावाच्या कामाला पालकमंत्र्यांकडून ब्रेक - बांधकाम करण्याची शेकऱ्यांची मागणी
सावली - सादागड हेटी येथील तलाची पाळ ऐन पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे फुटल्याने सिंचना अभावी पिके करपायला लागली मात्र शेतकऱ्यांनी तात्पुरती सोय करून पिके घेतली परंतु कायमस्वरूपी सिंचनाकरिता बांधकाम करणे आवश्यक असतांना येथील मंजूर कामाला पालकमंत्र्यांनी स्थिगिती दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तलावाचे काम करण्याची मागणी माजी सभापती विजय कोरेवार यांचेसह शेतकऱ्यांनी केली आहे.
सावली तालुक्यातील सादागड हेटी येथील स नं 169 हा तलाव पूर्वीच लिकेज होते व पावसाळ्यात फुटले. शेतकऱ्यांचे शेतातील माती वाहून गेल्याने फारच नुकसान झाले. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी श्रमदानातून तात्पुरती बंधारा बांधून पाणी अडविले. पावसाळ्यात पाऊस चांगला पडल्यामुळे पीक काही प्रमाणात घेता आले. मात्र यावर्षी तलावाचे काम न झाल्यास येथील शेतकरी पीक घेऊ शकत नाही. सदर काम मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाली असताना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील कामांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिल्याने सदर काम रखडले आहे. तलावाचे काम सिंचनासाठी आवश्यक असल्याने बांधकाम करण्याची मागणी जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी चंद्रपूर यांचेकडे माजी सभापती विजय कोरेवार यांचेसह शेतकरी सुरेश मडावी , बाळकृष्ण मडावी , भीमराव सिडाम , विलास मडावी , भीमराव सिडाम , विलास मडावी ,गनू गावडे , चारगावचे उपसरपंच राजू वलके, श्रीकांत बहिरवार, राजू कंचावार यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!