तळोधी (बा.) येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव संपन्न



तळोधी बा.(यश कायरकर)
      तळोधी (बा.) येथे श्री  संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव   मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  या निमित्त तळोधी (बा.) नगरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जय संताजी तेली समाज  तळोधी (बा.)च्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंती निमित्त जयंती महोत्सव संपन्न झाला. जयंती महोत्सवाचे उद्घाटन मा. डॉक्टर श्रीराम एस. कावळे, प्र-कुलगुरू ,गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली यांच्या हस्ते संपन्न झाला .याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मा. आ. कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया, आमदार- चिमुर विधानसभा क्षेत्रप्रामुख्याने उपस्थित होते.* कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गौरव विष्णुजी देशमुख हे लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रामदास आर. कामडी, विद्या परिषद सदस्य -गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली , मा. इंजिनियर यश अनिलराव बांगडे, नवनिर्वाचित सिनेट सदस्य- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच प्रा. डॉ. माधवजी वरभे, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही, स्त्री रोग तज्ञ  डॉ. सौ.पद्मजा माधवजी वरभे, प्रा.अतुल कामडी , अध्यक्ष- जय संताजी तेली समाज तळोधी (बा.) सौ छायाताई मदनकर ,सरपंच- ग्रामपंचायत तळोधी, श्री राजेश घिये, उपसरपंच -ग्रा.पं तळोधी श्री संजय डफ, सचिव- जय संताजी तेली समाज ,सौ सुरेखा दिलीप कामडी ,अध्यक्ष -महिला कार्यकारणी ,सौ अर्चनाताई देवानंद कामडी, सचिव -महिला कार्यकारणी ,श्री प्रशांत डहांगणे अध्यक्ष- युवा कार्यकारणी इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
     जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.
          श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृहाच्या बांधकामाकरिता आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिली.
      श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अतुल एन. कामडी ,अध्यक्ष -जय संताजी तेली समाज तळोधी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभांगी वीरेंद्र पाकमोडे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चनाताई देवानंद कामडी, सचिव -महिला कार्यकारणी यांनी केले कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!