भव्य अंडर आर्म क्रिकेट रात्र कालीन स्पर्धेचे व रुग्णवाहिका चे शिवानीताई वड़्डेटीवारचे हस्ते लोकार्पण.
तळोधी बा. :
शिवानीताई फॉन्स क्लब तळोधी बा. व लोकसेवा शिवानीताई फन्स च्या वतीने बाम्हणी वार्ड कृष्ण मंदिर देवस्थान जवळ भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा चे उदघाटन शिवानीताई वड़्डेटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ओबीसी विभाग संघटक धनराज भाऊ मुगंले, माजी सभापती प्रफुल्ल खापर्डे, माजी जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, प्रदेश सहसचिव नितीन कटारे, डा. गौरव देशमुख, डा. स्वप्निल कानडी, वसंतराव बडवाईक,वामनराव मदनकर,संरपच शालुताई हांडेकर यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित नागरिक याना मार्गदर्शन करण्यात आले.व नवनिर्वाचित निवडून आलेले काँग्रेस चे गोंविदपूर संरपच शालुताई हांडेकर, सदस्य अमजद शेख, गुलाब बोरकर,मंगला शेंन्डे,,ज़्योती आत्राम यांचे शिवानीताई वड़्डेटीवार व धनराज भाऊ मुंगले यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या अंडर आर्म क्रिकेट स्पधैत २४ संघानी भाग घेतला असून उपस्थित खेळाडू चे मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला. तसेच दिवाकर भाऊ निकुरे , विजय भाऊ वड़्डेटीवार, व शिवानीताई वड़्डेटीवार यांनी या परिसरातील गोरगरीब व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात उपचारासाठी रुगवाहिका भेट म्हणून दिले. त्या रुग्णवाहिका चे रिबन कापून लोकापर्ण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शविले होती. कार्यक्रमाचे संचालन संजय अगडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पौणीकर सर यांनी केले. व उपस्थित यांना महाप्रसाद देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!