सावरगाव येथे युवकाला भरधाव टिप्परने चिरडले, तनावाचे वातावरण , तीन तास रस्ता जाम.
सावरगाव येथे युवकाला भरधाव टिप्परने चिरडले, तनावाचे वातावरण , तीन तास रस्ता जाम.
यश कायरकर;
तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर - मूल हायवे वरील सावरगावच्या बस स्टॉप वर आज सायंकाळी 6:50 मिनिटांनी नागपूर कडून शिंदेवाही कडे जाणाऱ्या भरधाव टिप्परने युवकास चिरडले. यात युवक, कैलास कुकसू गेडाम वय 35 वर्ष हा जागीच ठार झाला. त्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन शिंदेवाही च्या दिशेने पडून गेला.
मात्र त्यानंतर गावातील संतप्त जमावाने सलग अडीच तास रस्ता जाम ठेवून, "तात्काळ टिप्पर ला पकडण्याची व मृतकाच्या परिवाराला ताबडतोब आर्थिक मदत देण्याच्या मागणी, तसेच या रस्त्याने रात्रंदिवस रेती तस्करी टिप्पर च्या साह्याने होत असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी तात्काळ रेती तस्करी बंद करावी व वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सावरगाव बस स्टॉप वर गतिरोधक तयार करण्यात यावे" अशी मागणी धरून सलग अडीच तास संतप्त लोकांनी रस्ता जाम करून ठेवलेला होता. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सेवकराम सावरकर या इसमाचा सुद्धा भरधाव वाहनाने टक्कर मारल्यामुळे मृत्यू झालेला होता. त्यामुळे गावातील संतप्त लोकांनी वाहनांच्या वेगावर आळा आणण्यासाठी रास्ता रोको केला व पोलिसांना शव ऊचलू दिला नाही.
जमावाला पांगवण्यासाठी व मृतकाचे शव उचलण्याकरिता पोलिसांनी विशेष दंगा विरोधी पथक बोलवून स्थिती रात्री 10 वाजता नियंत्रणात आणली. व रहदारी पुर्ववत केली. आणि शव विच्छेदना करता नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मृतकाच्या मागे त्याचे परिवारात फक्त त्याची पत्नी आणि मुलं आहेत . त्यांना दुसरा कोणताही आसरा नसल्यामुळे गावातील लोक संतप्त झालेले होते.
तळोधी बा.पोलीस ट्रक घेऊन फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!