सावली आदिवासी वस्तीगृहात मुलींची असुविधांमुळे गैरसोय - अभाआविप संघटनेचा आंदोलनाचा इशारा
सावली - आदिवासींच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक दर्जा व शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली . दोन्हीही वस्तीगृहाला शासकीय इमारत नसल्यामुळे सध्या खाजगी इमारती मध्ये भाडेतत्त्वावर वस्तीगृह सुरू आहेत . मात्र मुलींच्या वस्तीगृहात संख्येच्या प्रमाणात खोल्या नाहीत, सौचालय व स्नानगृह या भौतिक असुविधेचा अभाव असल्याने अभाआविप संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावली येथील आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील संख्या ५७ असून चार खोल्या , संडास दोन ,बाथरूम दोन असल्याने मुलींना शौचालयाला जाण्यासाठी व आंघोळ करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे मुलींची शाळेच्या वेळेवर तयारी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा शाळेचा टाइम टेबल बिघडतो. चार रूम असल्यामुळे प्रत्येक रूम मध्ये १५ विद्यार्थी व तेही बेड नसल्यामुळे जमिनीवर झोपावे लागत आहे . गर्दीमुळे अभ्यासावर सुद्धा मुलींच्या परिणाम होत आहे त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सुद्धा मुलींना सहन करावे लागत आहे. आदिवासी मुलींचे वस्तीगृह नॅशनल हायवेला लागून असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज येत असते आणि दोन्ही बाजूला बियर बार असल्यामुळे अनेकदा दारुड्यांकडूनही त्रास होतो, ग्रंथालय नाही, पार्किंग सुविधा नाही, खेळाचे मैदान नाही, अशा असुविधांमुळे गैरसोय होत असल्याने सदर मुलींचे वस्तीगृह इमारत बदलवून दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी यापूर्वी विद्यार्थ्यांनी गृहपाल व प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली होती. मुलींच्या वस्तीगृहाला प्रकल्प अधिकारी मृगनाथन व त्यांच्या कमिटीने प्रत्यक्ष येऊन व्हिजिट केली आणि मुलींना होत असलेली गैरसोय जाणून घेतली व दोन दिवसांमध्ये इमारत आम्ही बदलवून देण्याचे मुलींना आश्वासन दिले मात्र प्रकल्प अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने आदिवासी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे.
नवीन सुविधायुक्त इमारत उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आंदोलनाचा इशारा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुकाध्यक्ष प्रवीण गेडाम, लखन मेश्राम, रमेश कनाके, उतम गेडाम, पुरुषोत्तम पेंदाम, भास्कर गेडाम, मयूर गेडाम, श्यामसुंदर उइके आदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!