नगर परिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.०३ जानेवारी हा सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म दिवस म्हणून या दिवशी संपूर्ण देशात त्यांची जयंती साजरी करण्यात येत असते. सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी सुद्धा मानले जाते.तर दरवर्षी प्रमाणे यंदाही न.प.सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षक व विद्यार्थी तसेच आदी कर्मचारी मिळून साजरी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!