महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूर च्या वतीने 6 जानवारी पत्रकार दिनम्हणून साजरा करण्यात आले


बल्लारपूर (प्रतिनिधी)
संघा चा वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले
बल्लारपूर:-मराठी पत्रकारिते चे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा 6जनवरी  जयंती दिनी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत.
महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूर चा वतीने नगरातील सर्व पत्रकारांचे स्नेह मिलन नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार आणि पत्रकार संघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष स्व. सुरेश रामगुंडे यांचा समूर्ति प्रित्यर्थ रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण वैद्यकीय अधिकारी डॉ विजय कळस्कर यांचा हस्ते करण्यात आला.बल्लारपूर मेडिकल असोसिएशन BMA हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंदनसिह चंदेल माजी वनविकास महामंडळ(म .रा)प्रमुख अतिथी घनश्याम मुलचंदानी.विशेष अतिथी अब्दूल करीम भाई काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपस्थितीत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच यांचा शाल श्रीफळ समूर्तीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोठारी चे सरपंच अश्विनी हर्षल वासंमवार, जुनोना चे सरपंच विवेक शेंडे, बामणी चे सरपंच प्रल्हाद बुधाजी आलाम,ईटोली चे सरपंच तुळशीदास पिपरे,कटवली चे सरपंच राजेश ढुंमने यांचा सत्कार करण्यात आला, कवडजई चे सरपंच काही कारणास्तव येऊ शकले नाही मान्यवरांनी सर्व सरपंच यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या व गावाचा विकास करण्याकरिता प्रोत्साहन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य सदयस जेष्ठ पत्रकार पद्माकर पांढरे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मुन्ना खेडकर,बल्लारपूर तालुका अध्यक्ष अजय रासेकर,देवेंद्र झाडे, पारिष मेश्राम, रमेश निषादयांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात उपस्थित शहरातील जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर,नरेंद्र सोनारकर, नारद प्रसाद, सुजय वाघमारे, देवानंद देशभ्रतार, मनोहर दोतपेलली ,विशाल डुंबेरे,प्रशांत रणदिवे, राजू बबन बबन, राठोडआदी पत्रकार उपस्थित होते सर्व पत्रकाराना भेट वस्तू देऊन पत्रकार दिन म्हणून साजरा करून सर्व पत्रकार यांना गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!