नेरी_सोनापूर सि. सी. रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे, (गाववासीयांनी थांबले काम)
तळोधी बा: (यश कायरकर)
नागपूर येथील एका कंन्ट्रक्शन कंपनी द्वारे या परिसरात करोडो रुपये किंमतीचे कामे सुरू असून सोनापूर-नेरी या सि. सी. रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने सोनापूर येथील गावकरी वर्गानी काम बंद पाडून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सोनापूर चे उपसरपंच महेश फटिंग यांनी केले आहे.
नेरी ते सोनापूर या महामार्गावर गेल्या वर्षभरापासून संथगतीने कामे सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट पणे सुरक्षा भिंत आहे. सुरक्षा भिंतीला भेगा पडलेल्या आहेत. सोनापूर बसस्थानक वरील सि. सी. रोड साठी कमी दर्जाचे मटेरियल वापरले असल्याने रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तसेच याठिकाणी व्हायब्रंट मशीन सुध्दा वापर केला जात नाही, या मार्गावर जागोजागी कलवड साठी खोदकाम करून ठेवले मात्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या सिमेंट क्रांक्रिट वर पाण्याचा वापर करीत नसल्याने निकृष्ट दर्जाचे कलवड तयार होत आहे. नेरी ते तळोधी या मार्गाने दररोज एसटीच्या फेरी होते आहे. मात्र नव्याने सुरू असलेले बांधकाम अरूंद आहे. मात्र त्या ठिकाणी डांबरीकरणच्या दोन्ही बाजूला मुरुमाचे साईट बंब भरले नसल्याने वाहतूक करणारा नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. या महामार्ग चे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग बांधकाम कडे कानाडोळा करून दुर्लक्ष करीत आहे. तरी या रोडचे निकृष्ट बांधकाम ची चौकशी करण्याची मागणी सोनापूर वासीय जनतेनी केली आहे.
कोट
नेरी ते सोनापूर या सि. सि रोडचे बांधकाम साठी निकृष्ट दर्जाचे रेती व कमी प्रमाणात सिमेंट चा वापर करीत असून याठिकाणी सुरू असलेले काम व्हायब्रंट मशीन च्या दबाई न करता फावडे साहाय्याने ढकलले जाते आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग कडे रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगितले जात असताना सुध्दा विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. तरी कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
महेश फटिंग
उपसरपंच सोनापूर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!